Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home कोरोना आष्टी,बीडमध्ये संसर्ग वाढला आज पॉझिटिव्हचा आकडा ४३ च्या घरात

आष्टी,बीडमध्ये संसर्ग वाढला आज पॉझिटिव्हचा आकडा ४३ च्या घरात


बीड (रिपोर्टर):- नागरिक घराबाहेर पडतांना कोरोनाचे नियम पाळत नसल्याने शहरात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. आज आलेल्या ५५६ संशयितांच्या अहवालात सर्वाधिक पॉझिटिव्ह आष्टी शहरातले असून त्या पाठोपाठ बीड शहरातले आहेत. त्यामुळे आठवड्यात आज सर्वाधिक बाधितांचा आकडा ४३ वर जावून पोहचला आहे.
काल आलेल्या अहवालात केवळ २२ जण बाधित आढळून आले होते. त्यामध्ये आष्टी ४ आणि बीडमधल्या ७ रूग्णाचा समावेश होता तर आज आलेल्या अहवालात आष्टीत तब्बल १७ जण तर बीडमध्ये १५ जण बाधित आढळून आल्याने पॉझिटिव्हचा आकडा ४३ वर जावून पोहचला आहे. आरोग्य विभागाला दुपारी १२.३० वाजता ५५६ संशयितांचे अहवाल आले. त्यामध्ये ४३ जण पॉझिटिव्ह तर ५१३ निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ५, आष्टी १७, बीड १५, धारूर, गेवराई, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर या सहा तालुक्यात प्रत्येक १ रूग्ण आढळून आला आहे.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....