केज (रिपोर्टर)- पुढच्या महिन्यामध्ये केज नगरपंचायतच्या निवडणुका घोषीत होणार असल्याने स्थानिक राजकीय पुढार्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. काहींनी आपल्या हितासाठी मतदार यादीत बोगस नाव लावण्याचा सपाटा लावला असून जवळपास ४ हजार बोगस नावे लावण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या नावांची शहानिशा करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
केज नगरपंचायतची निवडणूक अद्याप घोषीत झाली नाही. विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. स्वत:च्या हितासाठी काही राजकीय मंडळींनी मतदार यादीत बोगस नावे लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. अंबाजोगाई, परांडा यासह इतर ग्रामीण भागातील नावे शहरामध्ये लावली जावू लागली आहेत. जवळपास ४ हजार पेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे समजते. दरम्यान शहानिशा करून मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट करावीत नसता आंदोलन छेडण्याचा इशारा भाऊसाहेब गुंड यांनी निवडणूक विभागाला दिला आहे.