वडवणी (रिपोर्टर):- सन 2020 पिक विमा तात्काळ द्यावा,ऊसाचे बिल अदा करावे,50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी यासह अन्य मागण्या घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वडवणी येथे रस्तारोको करण्यात आला असून आंदोलन कार्यकर्त्यानी सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत.
आज वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी मनसेच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी 2020 चा पिक विमा तात्काळ शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा,सततच्या पावसामुळे, तसेच ढगफुटीमुळे शेतकर्यांचा पिकांचे नुकसान झाले आहे, पंचनामे न करता, हेक्टरी 50000 रुपये मदत तात्काळ द्यावी, ई पिक पाहणी अट रद्द करुन, या वर्षीचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, साखर आयुक्ताच्या परवानगी शिवाय करखान्यातील वजन काट्याला छेड छाड करण्यात येउ नये,असे आदेश काढण्यात यावेत. वडवणी तालुक्यातील निराधार योजनेच्या फाइल तात्काळ मंजुर करुन, जाचक अटी रद्द करा, क्राँस चेकींग रद्द करण्यात यावी,चिंचाळा-ह.प्रिंपरी ते चिंचोटी या बोगस रस्त्याची चौकशी करुन संबधित यंत्रनेवर गुन्हा दाखल करावा यासह अन्य मागण्यासाठी सदरील रस्तारोको करण्यात आला असून तब्बल एक तास वाहतुक विस्कळीत झाली होती.या रस्तारोकोला जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील,महिला जिल्हाध्यक्ष रेखा अंबुरे,मारुती दुनगू यांच्यासह तालुकाध्यक्ष नवनाथ करांडे, हरिश्चंद्र पवार,रवि मात्रे, ईश्वर पुजारी,गोरख शेंडगे,सखाराम ढगे,सचिन शिंदे,नवनाथ दराडे,सुनिल बनपट्टे,वैभव वावधाने, अंकुश लोखंडे,रविंद्र क्षीरसागर,श्रीराम शिंदे, हनुमान घोलप, सिध्देश्वर गायकवाड,सचिन दरेकर ,संतोष शिंदे,सतिश मोरे,विलास जाधव आदि जण उपस्थित होते. या मागण्याचे निवेदन तहसिल प्रशासन दिले.