
निष्ठावंतांना चारित्र्याचा सल्ला, भ्रष्टाचार्यांना प्रवेश का?
ज्यांनी डीसीसी उद्ध्वस्त केली, जेलमध्ये गेले त्या मुंडे पिता-पुत्रांच्या प्रवेशावरून सोशल मिडियावर अजितदादांना सवाल
बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पालकमंत्री झाल्यानंतर बीडच्या पहिल्याच दौर्यात पक्षाची प्रतिमा अधिक उजळ करण्याहेतू गुंडापुंडांना सरळ करणार, गुंडापुंडांना प्रवेश देऊ नका, आपले चारित्र्य स्वच्छ ठेवा, सर्वसामान्यांची कामे करा, असं म्हणत कार्यकर्त्यांना झापजाप झापले होते. त्यांना स्वच्छ प्रतिमेबाबत सल्ले दिले होते. मग आता जिल्हा मध्यवर्ती बॅँक बुडवणारे जेलमध्ये जावून सजा काटणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काफिल्यात कसे? तेही अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होतोय. याआधीही गुंडपुंड, गुन्हे दाखल असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. असे एक ना अनेक सवाल सोशल माध्यमावरून थेट अजित पवारांना विचारले जात आहेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात नेत्यांच्या शब्दाला जेवढा मन तेवढाच खोटे शब्द ठरवणार्या नेत्यांना बीडची जनता थेट सवालही विचारते. जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री झाले, ते बीडमध्ये डेरेदाखल झाले तेव्हा अजित पवार यांनी बीडच्या राष्ट्रवादीला सल्ले देताना म्हटले होते. पक्षामध्ये गुंडपुंडांना स्थान नाही, चारित्र्यवान कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, पदाधिकार्यांनी आपले चारित्र्य स्वच्छ ठेवायला हवे, असे एक ना अनेक सल्ले कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र या कार्यक्रमानंतर बीडच्या राष्ट्रवादीत गुन्हे दाखल असलेले, अनेक पक्ष बदलणारे डेरेदाखल झालेत. एकतर अजितदादांना या लोकांच्या चरित्र आणि चारित्र्याबद्दल माहिती नसेल. परंतु बीडची जिल्हा मध्यवर्ती बँक उद्ध्वस्त करणारे मुंडे पिता-पुत्र हे जेलमध्ये जाऊन अले आहेत.
दोन-दोन तीन-तीन वर्षे हे जेलमध्ये राहीले आहेत. मग अशा लोकांना राष्ट्रवादीत प्रवेश कसा? असा जाहीर सवाल सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट अजित पवार यांना विचारला जात आहे. अंगण स्वच्छ असेल तर घर स्वच्छ असते अणि घर स्वच्छ असेल तर त्यावर सत्तेचे छत उभारते, इथे मात्र निष्ठावंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चारित्र्य सांभाळण्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे मात्र गुन्हे दाखल असलेले जेलमध्ये जावून आलेले, जिल्हा मध्यवर्ती बँक उद्ध्वस्त करून इथल्या शेतकर्यांना मरणयातना देणार्यांना अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश दिला जात आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडियावर पहायला मिळत आहेत. बीडची राष्ट्रवादी तशी मजबूत, मग अशा लोकांना राष्ट्रवादीत प्रवेश का? असा सवाल दबक्या आवाजात राष्ट्रवादीचे निष्ठावंतही विचारत आहेत.
ReplyReply allForwardAdd reaction








