पालखी मार्ग पाण्याखाली
माजलगाव (रिपोर्टर): राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला असून माजलगाव तालुक्यातही धुवाधार पावसामुळे काही भागातले जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालखी मार्गावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक थंडावली असून माजलगावचे धरण हे 50 टक्के भरले आहे. 6 हजार 867 क्युसेसने पाणी धरणात जमा होत असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या दोन दिवसांपासून माजलगाव तालुक्यात संततधार सुरू आहे. परिणामी नदी-नाल्या एक झाल्या असून अनेक शेतात नद्यांचे पाणी घुसल्याने शेत जलमय झाले आहेत. माजलगाव तालुक्यातला पालखी मार्ग पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक मंदावली आहे. मोठ्या पावसामुळे आणि शेत जलमय झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.








