
ओळखपत्र न वापरल्यास शिस्तभंगाची कारवाई
बीड, ( रिपोर्टर)ः- प्रत्येक शासकीय कर्मचार्यांनी ओळखपत्र वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र त्याचा वापर केला जात नाही. शासनाने आता नवीन परिपत्रक काढले असून जे कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागावर लावणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल यासह सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांना ओळखपत्र वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र याची अंमलबजावणी केली जात नाही. शासनाने ओळखपत्र वापरण्याबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे. जे कर्मचारी दर्शनी भागावर ओळखपत्र लावणार नाहीत. अशा कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.








