
हजारो आंदोलक रस्त्यावर,पिवळं वादळ कोणत्या दिशेने जाणार
बीड (रिपोर्टर): धनगर समाजाच्या अरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज हा संघर्ष करीत आला आहे धनगर समाजाची एस टी च्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आज यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी व सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाभरातून धनगर समाजाचे पिवळे वादळ धडकले या ठिकाणी आंदोलन करत आंदोलकांनी घोषणा दिल्या,आरक्षण आमच्या हक्काचं नाहीवकोणाच्या बापाचं,आरक्षणाची अमलबजावणी तात्काळ करा अश्या विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता

या प्रसंगी धनगर समाजाला संबोधित करताना यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर म्हणले की आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष ओलांडले तरी देखील हे राज्यकर्ते आम्हाला अरक्षणापासून वंचित ठेवत आले आहे आम्हाला या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षण देण्याचे शब्द दिला आहे परंतु अनेक वर्षे झाले आतापर्यंत धनगर समाजाची आरक्षणाची अमलबजावणी झाली नाही हे दुर्दैवाची बाब आहे आम्हाला दिलेला शब्द या सरकारने पाळावा तात्काळ एक विशेष अधिवेशन बोलवून धनगर समाजाची आरक्षणाची अमलबजावणी करावी धनगराला जर या सरकारने आरक्षण दिले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायमचे मुख्यमंत्री व हे सरकार राहील कारण धनगर समाज ही प्रामाणिक जात आहे जर एखाद्या व्यक्तीने आमचे भले केले तर आम्ही त्याचे उपकार जन्मभर विसरत नाहीत या सरकारने आमच्या मागणी कडे गांभीर्याने लक्ष देऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन हे पिवळं वादळ आंदोलन मुंबईच्या दिशेने प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करतील
आसा इशारा यावेळी यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिला या आंदोलनास जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धनगर समाज पारंपरिक सुंबरान मांडला होता ये तो अभी झाकी हे पिक्चर अभी बाकी हे अश्या घोषणा आंदोलकांकडून देत म्हणत होते की बीड जिल्ह्यात किती धनगर समाज आहे हे आम्ही लवकरच सांगणार आहोत याची ही सुरवात आहे आंदोलनात जिल्हाभरातून हजारो समाजबाबांधव आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपस्थित होता








