
नदी पात्रातून पाण्याचा मोठा विसर्ग
मांजरा नदीच्या महापूरामुळे नदी काठच्या गावात पाणी घुसले
केज, (रिपोर्टर)ः- मांजरा धरण 100 टक्के भरल्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीला महापूर आला. नदी काठी असणार्या काही गावात आणि शेतीत पाणी शिरल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. नदी काठच्या नागरीकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मांजरा धरणात पाण्याचा ओघ वाढल्याने या धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला महापुर असल्यानेनदीकाठच्या दैठण, राजेगाव, पिट्टी बोरगाव आदी नदी काठच्या गावात पाणी घुसल्याने शेतीचे व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 56 मंडळात अतिवृष्टी
गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील 56 मंडळात अतिवृष्टी झाली. बीड तालुक्यातील राजुरी, पेडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश, नाळवंडी, कुर्ला, पाली, बीड, पिंपळनेर, चर्हाटा, पारगाव शि, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, दासखेड थेरला, आष्टी तालुक्यातील दौलावडगाव, टाकरसिंग, आष्टी, धानोरा, धामणगाव, कडा, पिंपळा, डोईठाण, आष्टा, हरिनारायण, दादेगाव गेवराई तालुक्यातील गेवराई, जातेगाव, पाचेगाव, शिरसदेवी, रेवकी, तलवाडा, उमापूर, चकलांबा, माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव, तालखेड, नित्रूड, दिंद्रुड अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई, उजणी, केज तालुक्यातील हनुमंत मंडळ, विडा, नांदूरघाट, परळी तालुक्यातील धर्मापुरी, शिरसाळा धारूर तालुक्यातील धारूर, मोहखंड, अंजनडोह, वडवणी तालुक्यातील वडवणी, कवडगाव शिरूर तालुक्यातील शिरूर, रायमोह, ब्रम्हनाथ येळंब, गोमळवाडा, खालापुरी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
68 जनावरे वाहून गेली
दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लहान मोठे असे 68 जनावरे वाहून गेली आहे तर चाळीस वराह ही पुराच्यापाण्यात वाहून गेले. केज तालुक्यातील पिट्टीघाट येथे साठवण तलाव आणि नदी यांच्या पुरपरिस्थितीमुळे वस्तीवरील 442 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यातल्या अतिवृष्टीसाठी 56.74 कोटी अनुदान प्राप्त
बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे जरायत आणि बागायत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 56 कोटी 74 लाख रूपये प्राप्त झाले आहेत.








