
बीड (रिपोर्यर): बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात 26 सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने आता पुन्हा पाऊस पडणार असल्याने शेतकर्यांच्या उरात धडकी भरू लागली आहे.
26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.









