
बीड (रिपोर्टर): बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आजपासून पाऊस पुन्हा राज्यात सक्रिय झाला आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. यापूर्वी पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने आता पुन्हा पाऊस पडत असल्याने आहे ती पिके खराब होणार आहेत.
गेल्या दहा बारा दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने मोठी हानी झाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आजपासून पुन्हा पाऊस पडू लागला. जिल्ह्यातील विविध भागात सकाळपासून पावसास सुरुवात जाली. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने शेतकर्यांची चिंता अधिकच वाढली आहे.








