
बीड (रिपोर्टर): ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकारने मदत केली असली तरी भरीव मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्याच्या अनुषंगाने केंद्राचे आपत्ती व्यवस्थापन पथक बीड जिल्ह्यात येण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय पातळीवर बोलले जात आहे.
पुढच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर याठिकाणी हे पथक येणार आहे. या पथकाचा दौराही संभाजीनगरसाठी आलेला आहे. तेथून संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांना हे पथक भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहे. मात्र अतिवृष्टी होऊन जवळपास महिना-सव्वा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर हे पथक आता काय पाहणी करणार? असा प्रश्न शेतकर्यांमधून उपस्थित होत आहे.








