Saturday, January 23, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीने गाठला २५ महिन्यांतील उच्चांक

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीने गाठला २५ महिन्यांतील उच्चांक


मुंबई (रिपोर्टर)- पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील २५ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. तर डिझेलच्या दरानं ८० चा टप्पा ओलांडला आहे. मागील १० महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच प्रतिलीटर १४ रुपयांची वाढ झाली आहे.
सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचं हे सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्यामुळं आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ही वाढ झाल्याची बाब निदर्शनास येत आहे. या दरांमध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा करही समाविष्ट असतो. महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक महाग इंधनविक्री करणारं राज्य ठरत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल्या दरांत गुरुवारी वाढ केली. ज्यामुळं डिझेलचे दर २६-२९ पैशांनी आणि पेट्रोलचे दर २१-२४ पैशांनी वाढले. देशातील काही मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे आकडे पाहिले तर ते प्रतिलीटरमागे खालीलप्रमाणं असल्याचं आढळून येतं.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...