बीड, (रिपोर्टर)ः- बीड नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात रोज राजकीय उलथापालथ होतांना दिसून येत आहे. राजकीय दृष्टया संवेदनशिल असलेल्या बीडच्या राजकारणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह अजितदादांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का दलित नेत्यांच्या माध्यमातून आज बसला. अजितदादांचे चर्चेतील उमेदवार पप्पू कागदे आणि शरद पवार गटाचे चर्चेतील उमेदवार अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत अन्य दलित संघटनांच्या पदाधिकार्यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेत हक्काची एकी आणि प्रस्थापितांना नगर पालिकेच्या निवडणूकीत डोकेदुखी केल्याचे स्पष्ट जाणवले. रिपाइंचे पप्पू कागदे यांनी राजेशाहीला बीड शहरातून बाहेर फेकू म्हणत अजितदादांच्या राष्ट्रवादीला कडवे आवाहन दिले तर प्रास्तापित चळवळीतील कार्यकर्त्यांना तिकिट देत नाहीत हे आत्ता मला कळले असे म्हणत डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आक्रमकपणे टिका केली. उपस्थित पदाधिकार्यांनी 25 आणि 26 तारखेला समाजामधील मान्यवरांसोबत चर्चे करून या निवडणुकीबाबत निर्णय ठरविला जाईल असे जाहिर केले. या नंतर पक्षीय नेतृत्वाच्या तंबूर घबराट निर्माण झाली.
यावेळी व्यासिपठावर दलित चळवळीतील जेष्ठ नेते बबन वडमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, चर्मकार संघाचे ज्ञानोबा माने, वडार समाजाचे दिपक चौगुले, मजहर खान, अशोक सोनवणे, अॅड.सिध्दार्थ शिंदे आणि रवि वाघमारे आदी मान्यवर मंडळी पत्रकार परिषदेत व्यासपिठावर होते. नगर पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, मी कार्यकर्तो नसुन नेता आहे. त्यामुळे मी कोणाच्याही दारामध्ये तिकिट मागायला गेलो नव्हतो, मात्र गेवराईचे विद्यमान आ.विजयसिंह पंडित ज्यांचा मला फोन आला की स्वतः उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांचा निरोप आहे तुम्ही निवडणूक लढविली पाहिजे. मी सुरूवातीला त्यांना होकार न देता कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतो असे सांगितले. मात्र सर्वाच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत मला झुलवत ठेवुन माझ्या प्रतिमेचा वापर करत मला नगरपालिका निवडणूकीत डावलून चिन्हाच्या बाबतील माझ्या बाबत संभ्रम निर्माण केला. वास्तविक पाहता मी घडयाळ या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार होतो असे असतांना अमरसिंह पंडित, आ.विजयसिंह पंडित यांना नगर पालिकेमध्ये घोटाळा करत इनामी जमीन बळकवलेच्या पीटीआर तयार करायच्या आहेत त्यामुळे डुप्लीकेट दलिताला तिकिट दिले.
माझ्या सारख्याला तिकिट दिले असते तर बीड शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता. मी कोणाच्या ऐकण्यात राहिलो नसतो. सामान्य माणसाला नगर पालिकेत न्याय मिळालाअसता, सामान्यांची कामे झाली असती, मात्र हे प्रास्तापित राजकारणाण्यांना होवू द्याचे नाही म्हणुनच मला नगर पालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी डावलली. त्यामुळे इथून पुढे नगर पालिका आणि जि.प., पं.स निवडणूकीमध्ये पंडितांना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे समाजातील सन्मानीय आणि बुध्दीजिवी वर्गासोबत येत्या 25 व 26 तारखेला बैठक घेवून निर्णय घेणार आहे असे ही रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सांगितले. उलट मला दडपवण्यासाठी काल पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमच्या ऑफीसवर गर्दी असते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून नोटीस बजावली आहे.
मी नोटीसेचा मी तिव्र निषेध करतो मी पोलीस प्रशासनाचाही तिव्र निषेध करतो आज नाही तर मागील 30 वर्षापासून माझ्या ऑफीसवर किमान 500 सामान्य माणसं येत आहेत. ते त्यांचे आडलेले कामं करून घेवून जातात. त्यानंतर डीपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष अजिंक्य चांदणे म्हणाले की, 17 तारखेच्या फॉर्म भरायच्या दिवशी दुपारी 2.30 वाजेपर्यंत विद्यमान आ.संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मला उमेदवारी देतो म्हणत झुलवत ठेवले. माझ्या सारख्याला उमेदवारी दिली असती तर दिन, दलित, कष्टकरी आणि सामान्य माणसाचे नगरपालिकेतील सर्वच कामे झाले असते आणि नगर पालिकेतील भ्रष्टाचार पुर्णपणे बंद झाला असता मात्र कोणताही प्रास्तापित पक्ष माझ्या सारख्या मला किंवा इतरांना चळवळीतील माणसांना, कार्यकर्त्यांना निवडणूकीतील तिकिट देत नाहीत तर त्यांना सयाजीराव असा कानाखालचा माणूस लागतो म्हणूनच मला तिकिट नाकारले असेही यावेळी पत्रकार परिषदेत डीपीआयचे प्रदेश युवक अध्यक्ष अजिंक्य चांदेण म्हणाले.










