अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई नगरपालिकेच्या उपाध्यक्षा आणि स्विकृत सदस्यांची आज निवड झाली. राजकिशोर मोदी यांच्या गटाकडून दिनेश भराडिया यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली तर मोदी गटाकडून राजकिशोर मोदी, बबन लोमटे या दोघांची स्विकृत सदस्यपदी तर नंदकिशोर मुंदडा गटाकडून संजय गंभिरे यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे.
अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकिशोर मोदी यांच्या आघाडीला 20 तर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या आघाडीला 11 जागे मिळालेल्या आहेत. आज उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. राजकिशोर मोदी यांच्या गटाकडून उपाध्यक्षपदासाठी दिनेश भराडिया यांनी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज आला होता तर स्विकृत सदस्य म्हणून राजकिशोर मोदी, बबन लोमटे यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा गटाकडून संजय गंभिरे हे स्विकृत सदस्य म्हणून निवडले गेले.












