केज । सय्यद माजेद
लाडेगाव परिसरामध्ये हिस्त्र प्राण्याने सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती केज पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. बिबट्याने शेळ्या मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.बिबट्या आहे की इतर हिस्त्र प्राणी याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
बापू अमिन शेख यांच्या सहा शेळ्या हिस्त्र प्राण्याने मारून टाकल्या आहेत. या शेळ्याचे अर्धवट पोट फाडून प्राण्याने खालले आहे. हा प्रकार शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती युसूफवडगाव पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस स्टेशनचे प्रभारी शेंडगे बिट अंमलदार सय्यद, हवालदार सुरेश गित्ते यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यामध्ये सदरील शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळ्या बिबट्याने मारल्या की इतर हिंस्त्र प्राण्याने याचा शोध वनविभाग घेत आहेत. या घटनेने लाडेगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.













