• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home अग्रलेख

अग्रलेख/सत्तेच्या सावलीतकामशासत्राचा उन्माद

by गणेश सावंत
March 22, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गणेश सावंत/9422742810

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशोक खरातसारखा भोंदू जेंव्हा महिलांच्या लैंगिक शोषणातून कोट्यवधी रुपयांची माया जमवतो तेव्हा त्या व्यक्तिला राजकीय, सामाजिक, आर्थिक बलाढ्य बनवण्यासाठी नेमके भाड कोण खातय? हा संतप्त सवाल आता विचारावाच लागेल. गेल्या आठ-पंधरा दिवसांच्या कालखंडात अशोक खराताच्या भोंगळेपणात हमाम में किती नंगे होतायत त्याचा आकडा वाढताना दिसतोय. निर्लज्जम् सदा सुखी अन् कामातुरा भय ना लज्जा असलेल्या राजकीय पांढरपेश्यांनी ज्या पद्धतीने अशोक खरातांसारख्या भामट्यांची दलाली केली आणि त्या दलालीत अवघे श्रीमंत – गर्भश्रीमंत आणि त्यांच्या बायाबापड्या अक्षरश: नागड्या झाल्या याला खरे दोषी राजकारीच नव्हे काय? हा एकीकडे प्रश्‍न उपस्थित केला जात असताना दुसरीकडे अशोक खरात याच्या बाहुपाशात आणि बेडवर किती अबला निजल्या, त्यांचे चारित्र्य हणन केले गेले याचा आकडा प्रचंड असल्याचे आता बोलले जाते. हा अशोक खरात श्रीमंत-गर्भश्रीमंत महिलांना नव्हे नव्हे तर राजकारणातल्या कामांधांना कसा वश करायचा, त्याकडे असे कोणते औषध होते, कोणती संमोहन करण्याची क्रिया होती याचा शोध घेतला असता हा भोंदू राजकारण्यांना श्रीमंत-गर्भश्रीमंतांना


ओक्ष्णो जल
द्यायचा. ओक्ष्णो जल म्हणजे काय? ओक्ष्णो हे नावही त्यानेच ठेवलं, जल म्हणजे पाणी, परंतु हे पाणी कशाचं असायचं?तर ओक्ष्णो जलमध्ये हा व्हॅग्राच्या गोळ्या (सेक्स पॉवर वाढवणार्‍या) मिसळायचा. अन्य काही गोष्टी मिसळून त्या ओक्ष्णो जलची चव खारट, कडवट असायची, असे पिडिताने एका मुलाखतीत सांगितले. हे ओक्ष्णो जलच्या आहारी गेलेले काही राजकारणी, गर्भश्रीमंत-श्रीमंत मोठमोठे अधिकारी, पैश्यावाले आपली कामवासना वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या अशोक खराताकडे यायचे. पद-पैसा-प्रसिद्धी आणि पोरगी हा हव्यास या लोकांचा असायचा. ओक्ष्णो जलमधून काम उत्तेजना वाढायची. ओक्ष्णो जलच्या नादी लागलेले आम्ही तर त्यांना कामांधच म्हणून, नराधमच म्हणू, (जरी ते पिडित असले तरी) पन्नास ते सत्तरीच्या कालखंडात वयानुसार प्रत्येकाची कामक्षमता कमी होते, ती वाढवण्याहेतू हा भोंदू या सर्वांना आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि इथेच हा हरामखोर अशोक खरात


भगवान श्रीकृष्ण
असल्याचा दावा करायचा. जेव्हा एखादी महिला त्याच्याकडे यायची तेव्हा त्या महिलेला तो ओक्ष्णो जल पाजायचा. ज्यामध्ये की कामक्षमता वाढवणार्‍या व्हॅग्राच्या गोळ्या मिसळायचा. अर्ध्या ते एका तासाने तुमच्यावरील ईडा-पिडा टाळण्यासाठी तुम्हाला माझ्याशी संग करावा लागेल. मी कृष्ण तू माझी राधा म्हणत त्या महिलांचा तो उपभोग घ्यायचा. यापुढे जात हा अशोक खरात स्वत:ची लघूशंका या लोकांना पाजायचा. ही सर्व माहिती जेव्हा समोर येत आहे तेव्हा तळपायाची आग नुसती मस्तकाला जात नाही तर या अशोक खरातचे अक्षरश: नरडे दाबावे नव्हे तर त्याच्या नरड्यावर पाय द्यावा, एवढा संताप उभ्या महाराष्ट्रात सध्यातरी पहायला मिळतोय. हिंदू देव-देवतांच्या नावे असे भामटे सर्रासपणे सर्वसामान्यांची आर्थिक, मानसिक, शारीरिक पिळवूक करतात तेव्हा तुम्ही-आम्ही समजून घेऊ परंतु राजकीय पुढारी, संविधाननिक पदावर असलेले जबाबदार मंत्री, क्लासवन अधिकारी, श्रीमंत-गर्भश्रीमंत सुशिक्षीत लोक जेव्हा अश्या भामट्यांच्या जाळ्यात येतात, आपलं सर्वस्व त्याच्या हवाली करतात तेव्हा नेमका दोषी कोण? अशोक खरात की सर्वच क्षेत्रात स्वत:ला सर्वश्रेष्ठ म्हणवून घेणारे हे धनीक? आम्ही गेल्या तीन दिवसांपासून हे प्रकरण लिहितोय. अनेक घडामोडी समोर येतायत. सत्य माहिती समोर येतेय. त्यातला किळसवाणा प्रकार, संतापजनक क्रिया पाहिल्या आणि ऐकल्यानंतर डोकं सुन्न पडतं. अशा घटनांना ज्यांनी अंजाम दिला त्या लोकांना तेव्हा काहीच प्रश्‍न कसे पडले नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. या


मुर्खांनी अनामिका कापल्या ओ
हसावं की रडावं, एवढी अंधभक्ती, एवढा मूर्खपणा. ‘नवसे कन्या पुत्र होती मग का करने लागे पती’ जगद्गुरू तुकोबांनी साडेतीनशे वर्षापूर्वी नवस केल्याने लेकरू होत असेल तर मग नवरा करण्याची गरज काय? हा सनसनीत सवाल आपल्या अभंगातून केला होता. पाच हजारापेक्षा जास्त अभंग असलेल्या गाथेमध्ये अंधश्रध्देवर शेकड्यावर अभंग आहेत, खरी भक्ती कशाला म्हणतात, हे ज्ञानोबा-तुकोबा ते गाडगेबाबा, तुकडोजी महाराज इथपर्यंतच्या लोकांनी लिहून ठेवले आहे, असे असताना या भामट्याचे राजकारणी पाय पुजतात, हे सांगतो तसे वागतात, त्याचे मुत्र पितात, नव्हे नव्हे तर काळ्या जादू-टोण्यासाठी हाताची अनामिका कापत चांदीच्या महादेवावर रक्ताभिषेक करतात, खरंतर आधी या लोकांना जोड्याने मालं पाहिजे. हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा ते थोडक्यात आवरेल, असं वाटलं. परंतु या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आहे, इथे नुसते लैंगीक शोषण नाही, इथे महिलांवर बलात्कार, घराघरामध्ये वाद, जमीन-पैश्याची लूट, लोकांच्या आस्थेशी खेळ, फसवूक या सर्व क्रिया या अशोक खरातसारख्या निर्लज्ज-नालायक माणसाने आपल्या कार्यकाळामध्ये केले. एकप्रकारे


रांडेनं केला गाढव
नेसावया साडी-सेलार चुनडी, अंगीची कानचोळी जिळ्या फुले तुका म्हणे केले रांडेने गाढव असा काहीसा प्रकार अशोक खराताच्या भक्तांबाबत पहायला मिळतो. घरी रांडा-पोरं मरती उपवासी सांगे लोकापासी थोरपण. घरी किती हाल आहेत, आपण किती अडचणीत आहोत, आपले सर्वस्व त्या अशोक खराताने हिरावून घेतले आहे तीही काही पिडीत स्वत:चे थोरपण सांगत, ‘तो म्ही नव्हेच’च्या भूमिकेत पहायला मिळतायत हे दुर्दैव. या अशोक खराताने एका प्रकरणात तर एका मुलीच्या आईसमोर त्या मुलीचं लैंगिक छळ एकप्रकारे केला. किती हे संतापजनक. काय काय घटना सांगाव्यात. योनी पुजनापासून शय्यासोबतीपर्यंत मांडायचं झालं तर अक्षरश: संतापाचा कडेलोट होईल. एवढे भयानक हे प्रकरण आहे. म्हणून आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना आणि इथल्या व्यवस्थेला मागणी आहे,


पुन्हा खरात होणार नाही
याची ‘खबरदारी’ घ्यायची असेल तर ‘खबरदार’ या वृत्तपत्राने गेल्या वर्षाभरापूर्वी ज्या पद्धतीने खराताच्या बातम्या छापल्या, त्याची दखल घेतली असती तर शेकड्यांवर महिलांचे चारित्र्य वाचले असते. त्यांचे वस्त्रहरण झाले नसते. परंतु आता बस्स! असे खरात जन्माला येणार नाहीत, असा भोंदूपणा कोणी करणार नाही, यासाठी या खरातला कठोरातील कठोरर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात जे दलाल असतील, जे भाड खाऊ असतील, एजंट असतील त्यांना समाजासमोर आधी आणा, लोकांमध्ये त्यांची नावे जाहीर करा. मग ते पुढारी असोत, सतताधारी असोत, विरोधक असोत, अधिकारी असोत, श्रीमंत असोत की गर्भश्रीमंत असोत. त्यांचे नागवेपणही तेवढेच या प्रकरणाला जबाबदार आहेत. त्यांच्यावरही तेवढीच कठोर कावाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट धार्मिकतेच्या नावाखाली महाराष्ट्रात जो धर्मांधतेचा उदो उदो केला जातोय तो आधी बंद करायला पाहिजे. जात-पात-धर्म-पंताच्या पलिकडे साधू-संतांनी समाजव्यवस्थेला दिशा दिली, दांभिकतेवर प्रहारर केले. हे लोकांपर्यंत आलं पाहिजे. तेव्हाच असे खरात जन्माला येणार नाहीत. 

Previous Post

वारोळा (ता. माजलगाव) येथे राहत्या घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापासंयुक्त कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका; एजंटसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जयभवानी साखर कारखान्यातील चोरीचा ६ तासांत छडा; आरोपींसह मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

by गणेश सावंत
June 28, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post

जयभवानी साखर कारखान्यातील चोरीचा ६ तासांत छडा; आरोपींसह मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल
  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?