Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमवडवणीतील फिल्मस्टाईल हाणामारी प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

वडवणीतील फिल्मस्टाईल हाणामारी प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी व अभियंता यांच्या मध्ये काल रात्री झालेल्या फिल्मस्टाईल हाणामारी प्रकरणात मुख्यधिकारी यांनी अंभियात्यासह अन्य दोघा जणाविरुध्दात वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे यामध्ये अभियंताचे वडिल देखील आरोपी आहेत.
वडवणी नगरपंचायतीचे सिओ प्रशांत पाटील यांनी अभियंता सुमितकुमार दिलीपराव मेटे यांच्याकडे सोपविलेल्या प्रलंबित कामकाजा विषयी विचारणा केली असता त्यांनी उध्दटपणे वागून धमकी दिली आणि वडिल दिलीपराव मेटे व अन्य एक सुनिल कदम यांना कार्यालयात बोलवून घेतले व सिओ पाटील हे शासकिय काम करत आसताना अभियंताचे वडिल म्हणाले कि,माझ्या मुलाला काम का सांगतो तुला दाखवतोच असे म्हणुन सुनील कदम यांनी सिओ पाटील यांच्या गच्चुरीला धरुन कार्यालयाच्या बाहेर ओढत काढले व अभियंताचे वडिल दिलीपराव मेटे यांच्या हातातील स्टीलचे रोडने पाठीवर व खांद्यावर आणि दोन्ही पायाच्या मांडीवर आणि पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले व सुनिल कदम यांच्या जवळ असलेल्या चाकूने सिओ पाटील यांच्या उजव्या तळहातावर व अंगठ्यावर वार करुन गंभिर दुखापत करुन जखमी केले व शिसकिय कामात अडथळा निर्माण केला आहे.म्हणुन सिओ प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन संबधित अभियंता सुमितकुमार दिलीपराव मेटे यांच्यासह वडिल दिलीपराव मेटे व सुनिल कदम रा.बीड यांच्या विरोध्दात गु.रं.नं.05/2021 कलम 353, 332, 333, 109,120 ब, भांदवी नुसार वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असुन या घटनेचा आधिक तपास पोलीस उपनिरिक्षक परदेशी हे करत आहेत.

धुरा ऐवजी जाळच निघाला
वडवणी नगरपंचायतीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे.निवडणुक कधी लागेल यांचा नेम नसताना नेते गणाच्या आणि पक्षाच्या व निवडणुकीच्या चर्चा सध्या शहरासह तालुक्यात आवडीने केल्या जात आसताना अचानक काल सायंकाळच्या सुमारास नगरपंचायतीचे सिओ पाटील आणि अभियंता मेटे यांच्यामध्ये फिल्मस्टाईल हाणामारी झाली असल्याने निवडणुकीच्या धुरा ऐवजी प्रशासनातील आधिकाऱ्यामध्येच जाळ झाल्याची सर्वत्र चर्चा होताना दिसून आली आहे. आरोपींमध्ये अभियंत्याच्या वडिलाचाही समावेश

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!