Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeन्यूज ऑफ द डेBudget 2021-काय झालं स्वस्त? काय महाग?

Budget 2021-काय झालं स्वस्त? काय महाग?


ऑनलाईन रिपोर्टर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वित्तीय वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनीही जनतेला निराश केलेलं नाही. कोरोनाचं जागतिक संकट असतानाही अनेक गोष्टींवरील आयात कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं अर्थमंत्री सीतारामन यावेळी म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात दोन गोष्टी सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार की नाही? आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार व कोणत्या महागणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागून असतं. यातील पहिल्या गोष्टीत म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सरकारकडून यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण अनेक महत्वाच्या गोष्टींवरचा आयात कर कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. नेमकं काय स्वस्त होणार? आणि काय महागणार? हे जाणून घेऊयात…

काय होणार स्वस्त?

स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
तांब्याच्या वस्तू
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू

काय महागणार?

मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्यानं मोबाइलच्या किंमती वाढणार आहेत.
परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
परदेशातून आयात केले जाणारे कपडे
कॉटनचे कपडे महागणार

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!