बीड (रिपोर्टर) अज्ञात चोरट्याने जिन्यातून घरात प्रवेश करत घरातील रोख रकमेसह दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधेगाव येथे काल रात्री घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगांबर बाबासाहेब शिंदे (वय 30 वर्षे, रा. बोधेगाव ता. परळी) यांनी सिरसाळा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील जिन्यावरून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले रोख 30 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. काल सकाळी आपल्या घरात चोरी झाल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिरसाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.