Friday, May 20, 2022
No menu items!
HomeUncategorizedभ्रष्ट अधिकार्‍यावर कारवाई करा, बेमुदत उपोषण

भ्रष्ट अधिकार्‍यावर कारवाई करा, बेमुदत उपोषण

इनामी जमीन बेकायदेशीर खालसा केल्या, शेकापचे धरणे आंदोलन
बीड (रिपोर्टर):- केंद्र सरकारने जाचक तीन कृषी कायदे आणले असून ते रद्द करण्यता यावे यासह इतर मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर इनाम जमीन बेकायदेशीर खालसा करणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी लोक तांत्रिक जनता दलाच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.

2 1

गेल्या दोन महिन्यापासून दिल्ली येथे शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. कृषी कायदे रद्द करण्यात यावे, महागाई कमी करावी यासह इतर मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा चिटणीस बाळासाहेब घुमरे, अभि लोंढे, ऍड.नवले, शेख इरफानसह आदींची उपस्थिती आहे. ‘

4 2

तर दुसरे आंदोलन लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने करण्यात येत आहे. गेवराई तालुक्यातील उक्कडपिंपरी येथील सर्व्ह नं.८ मधील ५ एक्कर १७ गुंठ्ठे जमिनीचा ७/१२ व गैर इनामदार यांच्या मालकी रकाण्यामध्ये नावे नोंद करण्यात आली या जमिनीवर न्यायालयाने मनाई हुकूम असतांना सुद्धा कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीर प्रकार केला असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील दर्गाहची जमीन, अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नं.७६, ५१०, ६२३ धारूर मधील सर्व्हे नं.५१०, ६२३, बीड येथील जुना बाजार भागातील सर्व्हे नं.४५, ४६, २०, १७०, आष्टीतील सर्व्हे नं.११५, पात्रुड येथील सर्व्हे नं.२४५ यासह अन्य जमिनीचे बोगस कागदपत्र तयार करून खालसा करण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषी विरोधात कठोर कारवाइ करण्यात यावी अशी मागणी सय्यद सलीम बापु यांच्या वतीने करण्यात आली असून त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे.

Most Popular

error: Content is protected !!