ग्रामसेवकाचे दुर्लक्ष; विहिरीत दुषित पाणी; युवकांचा आंदोलनाचा इशारा
बीड (रिपोर्टर): पिंपळनेर (गणपतीचे) पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीसह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत आहे. विहिरीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यावर शेवाळाचे थर जमा झाले असून ते पाणी दूषित असून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रा.पं.च्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.
पिंपळनेर ग्रामपंचायतीअंतर्गत पाण्याचा शुद्ध पुरवठा करण्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. पाण्याअभावी नागरीकांचे हाल होऊ लागले. पाणी येत नसल्याने काही नागरीक इतर ठिकाणावरून पाणी आणतात. ग्रामपंचायतीची जी विहीर आहे त्या विहिरीतील पाणी अशुद्ध असून पाण्यावर शेवाळाचे थर जमा झाले. ग्रामसेवकाचे पाणीपुरवठ्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याने गावकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. भर उन्हात गावकर्यांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रा.पं.च्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील तरुणांनी दिला आहे.