Monday, April 19, 2021
No menu items!
Home बीड अर्थसंकल्प : श्रीक्षेत्र भगवानगड, नारायणगड, गहिनीनाथ गडासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

अर्थसंकल्प : श्रीक्षेत्र भगवानगड, नारायणगड, गहिनीनाथ गडासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

बीड (रिपोर्टर)- राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर, श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र नारायणगड आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी आर्थिक तरतूद केल्याचे सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी दुसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. महिलांसाठी विशेष योजना, राबवण्याची घोषणा करतानाच राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबतही त्यांनी मोठा निर्णय घेतला. आजच्या अर्थसंकल्पात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असल्याचे सांगत लवकरच हा मार्ग पुर्ण होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या विकासासाठी आर्थिक निधीची तरतूद केली जाईल, असे सांगत श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेक्ष नारायणगड आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद केली गेली असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले.

गोपीनाथ मुंडे महामंडळाला कारखान्यांइतका निधी गोपीनाथ मुंडे महामंडळाला कारखान्यांइतका निधी देणार आणि गोपीनाथ मुंडे विकास महामंडळासाठी कारखान्यांकडून प्रतिटन 10 रु. घेतले जाणार. गोपीनाथ मुंडे महामंडळास कारखान्यांच्या निधीएवढा निधी सरकार दिला जाणार. रायगड जिल्ह्यात कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत उभारणार.आदिवासी विकास विभागासाठी ९७३८ कोटींची तरतूद.सारथी, बार्टी संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपयांची तरतूदबार्टी, सारथीला अजून पैसा लागला तर दिला जाणार.इतर मागास कल्याण विभागासाठी ३ हजार २१० कोटी रुपये.अल्पसंख्याक विभागासाठी ५९० कोटींची तरतूद

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...