नवी दिल्ली (वृत्तसेवा) न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी आज सरन्यायधीशपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे 16वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे पूत्र आहेत.
8 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी माजी उगख यू यू लळीत यांनी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. यूयू लळीत यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्या पत्राची प्रत न्यायमूर्ती चंद्रचूड यांना एससी न्यायाधीशांच्या उपस्थितीत सादर केली होती. कायदा मंत्रालयाने अशी विनंती केल्यावरच विद्यमान उगख त्यांच्या उत्तराधिकार्याच्या नावाची शिफारस करतात हे एक नियम आहे.