बीड (रिपोर्टर) वाळू उपसताना नियम धाब्यावर बसवले जात असल्याची तक्रार आ.लक्ष्मण पवार यांनी करत यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. याची दखल घेत आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी चार ठिकाणी वाळू पट्यात धाडी टाकून दहा ते पंधरा गाड्या जप्त करत काही वाळूही ताब्यात घेतली. विशेष करून पावती बुकही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने वाळूमाफियात एकच खळबळ उडाली. सदरील हे टेंडर राजकीय मंडळीचे आहे.
गोदापात्रातून वाळू उपसताना नियम धाब्यावर बसवण्यात येत आहे. याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असून याप्रकरणी दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी 24 मे रोजी आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घेतली. आज दुपारी जिल्हाधिकार्यांनी सावळेश्वर,पिंपळगाव, राक्षसभूवन,गुंतेगाव या वाळू पट्यात धाडी मारल्या. दहा ते पंधरा गाड्यासह काही ब्रास वाळू जप्त केली. नियमाचे उल्लंघन केल्याचे यावेळी दिसून आले. दोन पावतीबुक ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने वाळूमफियात एकच खळबळ उडाली. हे टेंडर राजकारण्यांचे आहे.