लाईट शिफ्टींग पोल,
नाली दुरुस्ती, रस्ते, घरकुल यासह अन्य प्रश्न नागरिकांनी मांडले; अधिकारी-पदाधिकार्यांना तात्काळ समस्या निवारणाच्या
सूचना
बीड (रिपोर्टर) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड, परभणीचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी शहरात गेल्या रविवारपासून ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियान सुरू केले असून या अभियानाला नागरिकांनी परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक जण आपल्या वैयक्तिक अडीअडचणींसह अन्य गार्हाणे मांडताना दिसून आले. या वेळी ना. मुंडेंनी आपल्या सोबतच्या अधिकारी, पदाधिकार्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तात्काळ निवारण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ‘डीएम खास फैसला ऑन द स्पॉट’चा प्रत्यय पुन्हा एकदा परळीकरांना आला.
आज भल्या सकाळी ना. धनंजय मुंडे राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानाला सुरुवात करत परळी शहरातील वार्डा वार्डात आणि घराघरात जावून लोकांशी संवाद साधत होते. शहरातल्या वार्डा वार्डात गेल्यानंतर अनेक ठिकाणी लाईटचे पोल शिफ्टींग, नाली, रस्ते, घरकुल यासह अन्य समस्या तेथील नागरिकांनी ना. मुंडेंसमोर मांडल्या. या वेळी त्यांच्या सोबत असलेल्या अधिकार्यांसह पदाधिकार्यांना त्या समस्यांचे निवारण तात्काळ करण्याच्या सूचना या वेळी ना. मुंडेंनी दिल्या. राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लोक डीएम खास, फैसला ऑन द स्पॉट करत असल्याचे प्रतिक्रिया देताना दिसून आले. ना. मुंडेंनी छोट्यातली छोटी समस्या ऐकून घेऊन ती तात्काळ मार्गी कशी लागेल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. आजपर्यंत शहरात याआधी कुठल्याही आमदाराने अथवा मंत्र्याने घराघरात जावून समस्या विचारल्या नाहीत. भाऊ तुम्ही पहिले आहात, जे आमचे प्रश्न, समस्या ऐकून तरी घेता, असे वृद्ध महिलेने ना. मुंडेंना गहिवरून येत सांगितले. या वेळी ना. मुंडे यांनी परळीकरांशी असलेलेे नाते यातून अधिक वृध्दंगित होत आहे, परळीतले प्रत्येक घर हे माझे आहे. असे म्हटले.