Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना सचिन तेंडुलकर करोना पॉझिटिव्ह सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली

सचिन तेंडुलकर करोना पॉझिटिव्ह सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली

मुंबई (रिपोर्टर):-भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोनाची लागण झाली आहे. सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. आपण होम क्वारंटाइन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे असं सचिनने म्हटलं आहे.
करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसेच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे, असं सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणार्‍या आरोग्यसेवेतील सर्वांचे मी आभार मानतो, असं म्हणथ त्यांनी आरोग्यसेवेतील कर्मचार्‍यांचे आभार मानलेत.
नुकताच सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं. सचिन भारत सरकारच्या करोनासंदर्भातील जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. अनेक क्रिकेटपटुंनी मास्क घालण्यासंदर्भात केलेल्या विशेष व्हिडीओमध्ये सचिनसोबत सौरभ गांगुली, राहुल द्रवीड यासारख्या खेळाडूंनी सहभाग घेत जनजागृती केली होती. काही दिवसांपूर्वीच सचिन रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचा अंतिम सामना खेळून परतल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जळच्या व्यक्तींच्या चाचण्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नियमांनुसार या व्यक्तींनाही करोना चाचणी करावी लागणार आहे.
राज्यात काही दिवसांपासून करोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिले. मॉल्स रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....