Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना बीडचे लॉकडाऊन वाढणार की नाही? सायंकाळी कळणार

बीडचे लॉकडाऊन वाढणार की नाही? सायंकाळी कळणार


राज्य शासनाच्या गाईडलाईन्स आल्यानंतर निर्णय -जिल्हाधिकारी
बीड (रिपोर्टर):- मध्यरात्री १२ च्या दरम्यान जिल्ह्यात लागू असलेला लॉकडाऊन संपुष्टात येणार, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागासह अन्य विभागाच्या अधिकार्‍यांसह कोरोनाबाबत नियुक्त केलेल्या समित्यांच्या बैठका घेतल्या. बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता असून जिल्ह्याचं लॉकडाऊन वाढणार, असे सुत्रांनी सांगितले.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन आज संपत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जगताप यांच्याशी रिपोर्टरने संपर्क साधला असता ते म्हणाले की, आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांची बैठक आहे. त्या बैठकीनंतर राज्य शासनाच्या गाईडलाईन्स येणार आहेत. त्यानुसार बीडच्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. या क्षणी मी आपणास या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही परंतु बीड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता समुह संसर्ग पाहता आणि जिल्हाधिकार्‍यांनी आज आरोग्य विभागासह अन्य विभागातील अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठका पाहता सुत्रांच्या माहितीनुसार बीडचे लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे.

आज ४८६ पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यातून काल २ हजार ९५९ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवालआज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये तब्ब ४८६ जण बाधित आढळून आले आहे तर २ हजार ४७३ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबाजोगाई १०७, आष्टी ५७, बीड १२०, धारूर ८, गेवराई ३०, माजलगाव ३७, केज ३४, परळी ४३, पाटोदा २६, शिरूर १५ आणि वडवणी तालुक्यात ९ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...