Home कोरोना 20 दिवसात 125 जणांचा मृत्यू 12 हजार 232 रुग्ण डिस्चार्ज

20 दिवसात 125 जणांचा मृत्यू 12 हजार 232 रुग्ण डिस्चार्ज


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा कहर वाढत आहे. गेल्या 20 दिवसात जिल्ह्यात तब्बल 15 हजार 561 बाधित रुग्णांची भर पडली तर 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 20 दिवसात 12 हजार 232 रुग्णांनी यशस्वी मात केली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा कहर सुरू आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ज्या गावात दहापेक्षा जास्त रुग्ण आढळून येतात त्या गावात आरोग्य यंत्रणा जावून गावातील लोकांच्या अँटीजेन टेस्ट घेतल्या जातात व तडकाफडकी त्यांच्यावर उपचार सुरू केले जात आहे. मात्र नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातूनच मृतांची संख्या वाढत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version