Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमकॅनॉलमध्ये मोटारसायकल पडल्याने व्यापारी वाहून गेला कन्हेरवाडीजवळील घटना, शोध सुरू

कॅनॉलमध्ये मोटारसायकल पडल्याने व्यापारी वाहून गेला कन्हेरवाडीजवळील घटना, शोध सुरू


गेवराई (रिपोर्टर):- तलवाड्याहून गेवराईकडे मोटारसायकलवर येत असताना कॅनॉलमध्ये मोटारसायकल पडल्याने व्यापारी वाहून गेला. सदरील या व्यापार्‍याचा गेवराई पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीसांना मोटारसायकल आढळून आली आहे.
विष्णू नन्नवरे (वय 55, रा. संजयनगर गेवराई) हे तीन दिवसांपुर्वी तलवाड्याहून गेवराईकडे येत होते. त्यांची मोटारसायकल कन्हेरवाडीजवळील कॅनॉलमध्ये पडली. नन्नवरे विष्णू हे घरी न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. त्यांची गाडी कॅनॉलमध्ये असल्याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदरील मोटारसायकल विष्णू यांचीच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती एपीआय संदीप काळे यांना मिळताच त्यांनी आपले सहकारी प्रफुल्ल साबळे, बहिरवाळ, खटाणे यांनी पाहणी केली व विष्णू नन्नवरे यांच्यासोबत शोध सुरू केला.


दोन महिन्यात चौघांचा कॅनॉलमध्ये मृत्यू
कन्हेरवाडी येथील कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे गेवराईसह इतर परिसरातील मुले या ठिकाणी पोहण्यासाठी येतात. गेल्या दोन महिन्यात पोहण्यासाठी आलेले चौघे जण या कॅनॉलमध्ये बुडून मरण पावलेले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!