Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडधारूरचाटगावच्या तलावातील पाणीसाठा राखून ठेवा

चाटगावच्या तलावातील पाणीसाठा राखून ठेवा

सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचे तलावातच आंदोलन

किल्ले धारूर (रिपोर्टर):- धारुर तालुक्यातील चाटगाव येथील तलावात दिंद्रूड ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनी तलावातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे येथील तलावातून अवैधरित्या पाणी उपसा करणारे मोटरी काढून टाकाव्यात या मागणीसाठी आज सकाळपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
दिंद्रुड गावाला धारुर तालुक्यातील चाटगाव तलावातून पाणी पुरवठा केला जातो परंतु या तलावात अवैधरित्या अनेक शेतकर्‍यांनी मोटर टाकून रात्रंदिवस बेसुमार पाणी उपसा सुरू केला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अगोदरच पाणी पातळी खालावली आहे त्यातच अवैधरित्या अनेक मोटरी चालू असल्याने पाणीसाठा लवकरच संपणार आहे आणि ऐन उन्हाळ्यातच दिंद्रूड गावाला पाणीटंचाईचे भीषण संकट भेडसावणार आहे या तलावातील मोटरी काढून टाकाव्यात व पाणीसाठा पिण्यासाठी शिल्लक ठेवावा या मागणीसाठी आज सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी तलावातच जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत धारूर तहसील कार्यालयाला १ महिन्यापूर्वी लेखी निवेदनाद्वारे कळवले होते तरीदेखील कुठलाही कारवाई केली नसल्याने तसेच जिल्हाधिकारी यांनाही याबाबत कळवले होते तरीपण मोटरी काढले नाहीत पाणीसाठा संपण्याचा धोका निर्माण झाला आहे यासाठी आज पासून जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे सरपंच अजय कोमटवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरीक तलावातच आहेत.
चाटगाव येथील तलावातून दिंद्रूडला पाणी पुरवठा केला जातो नागरीकांच्या आंदोलनाची दखल तहसिल प्रशासन व लघु पाटबंधारे प्रसाशन यांनी घेतली आहे याबाबत कारवाही करु कायदेशीर बाबी पाहून साबंधिताना नोटीस देवू.
-प्रकाश गोपड,नायब तहसीलदार धारूर

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!