Friday, May 7, 2021
No menu items!
Homeक्राईमपोलीसांच्या नावाने फेक अकाऊंट उघडून भामटक्याकडून पैशाची मागणी

पोलीसांच्या नावाने फेक अकाऊंट उघडून भामटक्याकडून पैशाची मागणी

बीड (रिपोर्टर):- पोलीस आणि अधिकार्‍यांच्या नावाने फेक अकाऊंट बनवून त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना पैशाची मागणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. बीड ग्रामीण ठाण्यातील तत्कालीन पीएसआय बालाजी ढगारे यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले असून त्याद्वारे भामटा पैसे मागत आहे. त्याला कोणीही पैसे देऊ नये असे आवाहन स्वत: पीएसआय बालाजी ढगारे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी औरंगाबाद येथे सायबर विभागात तक्रार दिली आहे.

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. भामटे लुटण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाने देखील फेक अकाऊंट बनवून त्यांच्या ओळखीच्या लोकांना फेसबुकवरून पैशाची मागणी करतात आणि अकाऊंटला पैसे मागवून घेतात. खात्री केल्याशिवाय कोणालाही पैसे देू नये, असे आवाहन सायबर विभागाच्या वतीने केले जात असले तरी अशा भामट्यांना अनेक जण बळी पडतात. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्कालीन पीएसआय म्हणून असलेले बालाजी ढगारे यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट बनवण्यात आले आहे. त्याद्वारे पीएसआय ढगारे यांच्या ओळखीच्या व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी पैशाची मागणी केली जात आहे. यासंदर्भात खुद्द बालाजी ढगारे यांनीच औरंगाबाद सायबर विभागाकडे तक्रार केली असून कोणीही ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!