गेवराई (रिपोर्टर) बीड जिल्ह्याचे मुजोर प्रशासन वाळू माफियांच्या पाठिशी असल्याचा घणाघाती आरापे करत जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचे देणेघेणे नाही. गावकर्यांचे देणेघेणे नाही. सर्वसामान्य नागरिकांचा वाळू माफियांच्या गाड्यांखाली जीव जातो. याचेही प्रशासनाला सोयरसुतक नाही असं म्हणत आ. लक्ष्मण पवार यांनी टेंडर रद्द करावं, या मागणीसाठी थेट गोदावरी पात्राच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. या वेळी गंगावाडी येथील महिलांसह गावकर्यांची लक्षणीय उपस्थिती होती. गोदावरी पात्रात उतरून आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संतप्त होत प्रचंड गोषणाबाजी केली.
गेवराई तालुक्यातील गंगावाडी या ठिकाणी वाळू ठेका मंजूर झालेला आहे परंतू या ठेका घेताना कागदपत्राच्या पुर्ततेत ग्रामसभेचा ठराव सरपंच याचा ठराव बोगस आहे. बनावट सह्या करूण हा वाळू ठेका मिळवलेला आहे. असे गांवकरी यांचे म्हणने आहे परंतू दोन दिवसापुर्वी गांवकर्यांनी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला आ. लक्ष्मण पवार यांनी सहभाग नोंदवला असता महसुल प्रशासनाने मधस्थी करून दोन दिवसांत सदरचा वाळू उपसा व ठेका बंद केला जाईल असे अश्वासन प्रशासनाच्या वतिने देण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत सदरचा वाळू ठेका बंद केला नाही म्हणून गांवकरी व आमदार यांनी गंगावाडी गोदापात्रात बसुन आंदोलनाला सुरूवात केली आहे तसेच या आंदोलनात महिलाचा देखील सहभाग आहे. यावेळी घटनास्तळावर उपअधीक्षक संतोष वाळके , पोलस निरीक्षक प्रताप नवघरे , तलाठी , मंडळ अधिकारी , यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.