Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाईदच्या तीन दिवस आधी लॉकडाऊन शिथिल करा - सलीम जहॉंगीर

ईदच्या तीन दिवस आधी लॉकडाऊन शिथिल करा – सलीम जहॉंगीर

पाच ते सहा तासांचा वेळ
द्या आणि
रेशन दुकानांना धान्य वाटपाची परवानगी द्या
बीड (रिपोर्टर): जिल्हा प्रशासनाने आणखी पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहेत मात्र हा लॉकडाऊन रमजान ईदच्या तीन दिवस आधी शिथिल करावा. ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना किराणा व इतर अत्यावश्यक सामान खरेदीसाठी सोमवार दि.१० मे पासून ठराविक पाच ते सहा तासांची सवलत द्यावी, जेणेकरून एक दिवस आधी म्हणजे १३ मे रोजी होणारी गर्दीही कमी होईल आणि सर्वांची सोय होईल. त्याचबरोबर ईदच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांना धान्य पुरवठा करून लॉकडाऊनमध्ये सर्व रेशन दुकाने कोविड नियमांचे पालन करून सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनी केली आहे.\


बीड जिल्ह्यातील जनतेने नेहमीच प्रशासनाच्या आदेशाचा आदर केला आहे. जिल्हाधिकारी यांनी दि.८ ते १२ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र तारखेनुसार दि.१४ मे रोजी रमजान ईद आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या अत्यावश्यक तयारीसाठी वेळ मिळत नाही.१३ मे रोजी लॉकडाऊन उठल्यास त्यादिवशी बाजारपेठेत मोठी गर्दी होऊ शकते, कारण दुसर्‍याच दिवशी ईद आहे. सर्व मुस्लिम बांधव ईद साधेपणाने साजरी करणार असले तरी अत्यावश्यक समान जसे की किराणा, भाजीपाला, दूध , शुखुरमाचे समान खरेदी करणे आवश्यक आहे. यासंदर्भात प्रशासनाने ईद आणि मुस्लिम समाज बांधवांचा विचार करून लॉकडाऊन शिथिल करून दि.१० मे पासून पुढील तीन दिवस ठराविक तासांची सवलत द्यावी. ईदसाठी सर्व रेशन दुकाने सुरू ठेवून धान्य वाटपाचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनी केली आहे.

वाढीव शासकीय
दूध विक्री केंद्रांचे
नियोजन करा
बीड जिल्ह्यात तारखेनुसार दि.१४ मे रोजी रमजान ईद आहे. सद्या कोविड – १९ च्या अनुषंगाने कडक निर्बंध आहेत. त्यामुळे प्रशासनाने बीड शहरासह जिल्हाभरात ईदच्या दिवशी शासकीय दूध विक्री केंद्र संख्या वाढवावी. ज्यामुळे गर्दी होणार नाही आणि सर्व बांधवांना दूध सहज उपलब्ध होईल अशी मागणी भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनी केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!