Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाधक्कादायक : आरोग्य विभागाने मृत्युचा आकडा दडपला

धक्कादायक : आरोग्य विभागाने मृत्युचा आकडा दडपला


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या समुहसंसर्गाबरोबर बाधितांचे मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत असून हे मृत्यू रोखण्याऐवजी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचे आकडे लपवण्यात दंग असल्याचे उघड झाले असून बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद असतानाच दुसरीकडे आरोग्य विभागात मात्र याच महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद केली गेली आहे. यातूनच १०५ कोरोना बळींचा आकडा दडवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा यासह अन्य वैद्यकीय सेवेची अव्यवस्था सातत्याने समोर येत असताना आता जिल्हा आरोग्य विभाग मृत्यूचे आकडे लपवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या रोज १३०० पेक्षा जास्त कोरोनाबाधीत आढळून येत असून यामध्ये गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. अनेकांना कोरोना संसर्गाबरोबर निमोनियाची लागण झालेली आहे. यातून मृत्यूचे आकडेही वाढत आहेत. रोज कोविड रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असताना आरोग्य विभाग मात्र आकडे दडवण्यात मश्गुल असल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यामध्ये बीडमध्ये व अंबाजोगाईत ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे आरोग्य विभागात याच महिन्यात केवळ २७३ मृत्यूची नोंद असल्याने १०५ कोरोना बळींचा आकडा दडवल्याचे यातून उघड होत आहे. कोरोनामुळे मृत्युची संख्या वाढली असून या सर्व मृत्यूंची नोंद तात्काळ आयसीएमआर पोर्टलवर होणे अपेक्षित असते पण ती होत नसल्याचे दिसून येते. यावरून अधिक माहिती घेेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला त्या वेळास एप्रिल महिन्यात बीडमधील भगवानबाबा स्मशानभूमीत ११४ तर अंबाजोगाईतील स्मशानभूमीत २६४ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद नगरपालिकेत आहे इकडे मात्र आरोग्य विभागात या महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद दाखवण्यात आली आहे. सदरचा प्रकार हा गंभीर असून मृत्यूचे आकडे दडवण्यापेक्षा कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यु रोखण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष दिले तर अधिक बरे होईल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!