आष्टी (रिपोर्टर): भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज शनिवारी सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी होत आहे. यानिमित्त आष्टी तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये विद्युत रोषणाई, आकर्षक रंगरंगोटी,ने सजली असून ठिकठिकाणी सप्ताह, किर्तन, यात्रा, महादेवाच्या मंदिराच्या परिसरात ओम नमः शिवायच्या जयघोषात सुरू असलेले अभिषेक, महारूद्राभिषेक, होमहवन अशा विविध धार्मिक कार्यक्रम महाशिवरात्री निमित्त पार पडत आहेत.महादेव मंदिरात मोठया संख्येने भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.हर हर महादेव च्या गजरात आष्टी तालुक्यातील शिवालय भाविकांच्या अलोट गर्दीने भोलेनाथाच्या जयघोषाने दणाणले आहेत.श्री शिवशंकराच्या आराधनेत सोमवार व श्रावण सोमवार हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. मात्र या सगळ्यांत महाशिवरात्री या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्षभर एकही उपवास न करणार्या व्यक्तीदेखील महाशिवरात्रीला व्रतस्थ राहतात. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत देवाची उपासना केली जाते. ठिकठिकाणच्या महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्य