Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनामाजलगांवच्या ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यास प्रशासनाला अपयश ज्या गावात जास्त रुग्ण तेथील...

माजलगांवच्या ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यास प्रशासनाला अपयश ज्या गावात जास्त रुग्ण तेथील सर्व रुग्णांची चाचणी करा-थावरे


बीड (रिपोर्टर)ः-ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा जास्त फैलाव होवू लागला. प्रशासन मात्र शहरी भागातीलच कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात नियमांचेही पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना वाढू लागला. माजलगांव तालुक्यात अनेक गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात निघू लागली. ज्या गावात रुग्ण संख्या जास्त आहे. त्या गावातील सर्व नागरीकांची चाचणी प्रशासनाने करुन गावात निजंतूनाशकाची फवारणी करावी अशी मागणी गंगाभिषण थावरे यांनी केली.
माजलगांव तालुक्यातील आनंदगांव, सादोळा, लहूळ, पिटीआडगांव, दिंद्रुड, पात्रुड यासह अन्य गावामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आंनदगावांत आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यु झाला. ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोनाला रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. शहरी भागातच नियमाचं पालन करुन घेण्यास प्रशासन कामाला लागलेलं आहे. ग्रामीण भागात नियम पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होवू लागला. ज्या गावात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावातील सर्व नागरीकांची आरोग्य प्रशासनाने चाचणी करावी व कोरोनाचा संसर्ग रोखावा अशी मागणी गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!