Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमचाकुचा धाक दाखवून मोबाईल पळविला चौघा जणांना पोलिसांनी केली अटक

चाकुचा धाक दाखवून मोबाईल पळविला चौघा जणांना पोलिसांनी केली अटक


बीड (रिपोर्टर):- बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्याने जाणार्‍या एका खासगी नोकरदारास चौघांनी चाकुचा धाक दाखवून मोबाईल पळविला.


किशोर काकडे (रा. जरुड) हे मुनोत नेत्रालयात कामाला आहे. रात्री ते कामावरून बसस्टॅन्डच्या पाठीमागील रस्त्याने जात होते. या वेळी चोरट्यांनी अडवून त्यांचा चाकुचा धाक दाखविला व त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. काकडे यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली व त्यांच्या मदतीला काही लोक आले. ज्याने मोबाईल हिसकावला त्याला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या चोरटयास आपल्या साथीदारांची नावे विचारली असता यामध्ये अन्य तीन साथीदारांची नावे या चोरट्यांनी सांगितली. वचिष्ट काकडे यांच्या फिर्यादीवरून रामसिंग भोंड, सुयश सोनवणे, रोहन गायकवाड, मोहन टाक या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!