Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडग्राहकांच्या खिशाला आग पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, बीडमध्ये स्पीड पेट्रोल 110 तर साधे...

ग्राहकांच्या खिशाला आग पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, बीडमध्ये स्पीड पेट्रोल 110 तर साधे 107 रु. लिटर

बीड (रिपोर्टर):- जुलै महिन्याच्या आठ दिवसात सलग सहा वेळेस इंधन दरवाढ झाली असून आज गुरुवार रोजी ऑईल रिटेलर्सकडून दरवाढ करण्यात आल्याने देशात पेट्रोल दरात 35 पैशे तर डिझेलच्य दरात 9 पैशाने वाढ झाली असल्याने बीड जिल्ह्यात पेट्रोलचे दर 107 वर जावून पोहचले आहेत आणि डिझेल 96 रुपयांच्या घरात गेल्याने ग्राहकांच्या खिशाला आग लागली आहे. स्पीड पेट्रोल 110 रुपये दराने विकले जात आहे.


कोरोनाच्या महामारीने आधीच मेटाकुटीला आलेल्या देशातील सर्वसामान्य माणसांना आता महागाईचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशांना आग लागली असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य अक्षरश: मेटाकुटीला येऊन ठेपला आहे. जुलै महिन्यामध्ये आठ दिवसात पैशाने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ तब्बल सहा वेळा केली गेली आहे. तर गॅस सिलेंडर याच महिन्यात 25 रु. 50 पैशाने महागले होते. काल डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ झाली. आज पुन्हा ऑईल रिेटेलर्सकडून दरवाढ करण्यात आली असून पेट्रोल 35 पैशाने तर डिझेल 9 पैशाने वाढले आहे. सध्या दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मु-काश्मिगर, ओडीसा, तामिळनाडु, बिहार, पंजाब सिक्कीम आणि लद्दाखमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्याकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. बीडमध्ये पेट्रोलचे दर आज 107 एवढे झाले आहे तर डिझेल 96 दराने ग्राहकांना घ्यावे लागत आहे. या इंधन दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला आग लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!