बीड (रिपोर्टर) शेतीच्या सामाईक पाईपलाईनमध्ये आम्हाला हिस्सा का देत नाही? म्हणत बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथील दोन शेतकरी कुटुंबियात रात्री वादावादी झाली. त्याच वादावादीचा राग मनात धरून आज सकाळी या दोन्ही कुटुंबात मारामारी झाली आहे. याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
सचीन उत्तमराव दराडे आणि ज्ञानेश्वर पांडुरंग खंदारे या दोन शेतकरी कुटुंबात तलावातून शेतीसाठी जी पाईपलाईन करण्यात येत आहे त्यामध्ये दराडे कुटुंबिय हे खंदारे कुटुंबियाला आम्हाला या पाईपलाईनमध्ये हिस्सा द्या म्हणत वादावादी केली. खंदारे यांनीही कालच्या वादावादीचा राग मनात धरून आज सकाळी महादेव दराडे आणि सचीन दराडे यांना मारहाण केली. यामध्ये सचीन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.