जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असोसिएशनचे आंदोलन सुरू
नियम लावून परवानगी देण्याची मागणी
बीड (रिपोर्टर)ः- जिल्हा प्रशासनाने साऊंड सिस्टीमवर बंदी आणल्याने सदरील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. साऊंड सिस्टीमला नियम घालून सुरू करण्याची परवानगी दयावी या मागणीसाठी यासाठी साऊंड लाईट व्यापारी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे.
साऊंड सिस्टिमवर अनेक कामगार अवलंबून आहे. ही सिस्टिम बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. प्रशासनाने नियम घालून साऊंड सिस्टिम सुरू करण्याची परवानगी दयावी या मागणीसाठी साऊंड लाईट व्यापारी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे. यावेळी धम्मानंद वाघमारे, ओंकार सवाई, संदीप पटेकर यांच्यासह आदिंची उपस्थिती आहे.