छेडछाडीची केस मागे घे म्हणत जिवे मारण्याचा प्रयत्न
बीड (रिपोर्टर) छेडछाडीची केस मागे का घेत नाही, असे म्हणत एकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात आज सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 11 मे रोजी सोन्नाथडी (ता. माजलगाव) येथे घडली.
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल असलेले आरोपी सुनिल कसबे, बाळू कसबे, प्रभाकर कसबे (रा. सोन्नाथडी) यांनी संगनमत करून फिर्यादी राम संजय गोरे यास छेडछाडीची केस मागे का घेत नाहीस? या कारणावरून धक्काबुक्की करत जिवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला व खिशातील 5 हजार रुपये काढून घेतले, ही घटना 11 मे रोजी सोन्नाथडी गावात घडली. आज माजलगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिल्याने वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.