• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

आप्पाच्या गलथान गप्पा; आप्पासाहेब जाधवची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; संपर्कप्रमुख धोंडु पाटलाच्या पायावर सेनेचा धोंडा

by Beed Reporter
May 19, 2023
Reading Time: 1 min read
0
आप्पाच्या गलथान गप्पा; आप्पासाहेब जाधवची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; संपर्कप्रमुख धोंडु पाटलाच्या पायावर सेनेचा धोंडा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा वापर स्वार्थासाठी करणारे आप्पासाहेब जाधव यांनी काल थेट शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना चापटा मारल्याचा दावा केला. या दाव्याने राज्यभरात खळबळ उडवून दिली असता आज ठाकरेंच्या शिवसेनेने तडकाफडकी निर्णय घेत आप्पासाहेब जाधव यांच्यासह शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. उद्या बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची प्रबोधन यात्रा आहे. त्या कार्यक्रमाला गालबोट लागण्या हेतू शिंदे गटाने असे कृत्य घडवून आणल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे तर आप्पा जाधव यांनी केलेल्या खोट्या दाव्याची सर्वत्र छी…थू… होताना दिसून येत आहे. आप्पा जाधव हे सातत्याने वादग्रस्त राहिले आहेत. शिवसेना पक्ष वाढवण्यापेक्षा पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर स्वत:चे अर्थार्जन वाढवण्यात आप्पा जाधव मश्गुल होते, असे अनेकांचे म्हणणे आहे.
20 मे रोजी बीडमध्ये शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बुलंद तोफ सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत प्रबोधन यात्रेनिमित्त जाहीर सभा होत आहे. त्या सभेचे नियोजीत स्थळ पाहण्यासाठी काल सुषमा अंधारे या माने कॉम्प्लेक्स परिसरात होत्या. त्या दरम्यान आप्पा जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात वाद झाला. हाणामारीही झाली. गणेश रेकर व त्यांच्या समर्थकांनी आप्पा जाधव यांना प्रचंड मारहाण केली, गाडीची तोडफोड केली, त्या वेळी आप्पा जाधव घटनास्थळावरून पळून गेले. आपल्या बदमुर्ख वर्तनाचे पक्षाकडून गंभीरतेने घेतले जाईल, हे लक्षात येताच आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ काढून आपण थेट सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्या, असा दावा करत अंधारे पद देण्यासाठी पैसे मागतात, असा खोटा आरोपही केला. त्यामुळे राज्यभरात या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसून आल्या. ठाकरे गटाच्या शिवसेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मुखपत्र असलेल्या सामनामधून आप्पासाहेब जाधव यांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी केली. त्यांच्या सोबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनाही घरचा रस्ता दाखवला. आप्पासाहेब जाधव यांचे बोलविते धनी शिंदे गट असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.

आप्पा, महिलेला मारल्याचा दावा
करणे हे मर्दाचे लक्षण आहे का?
खरंतर ही चौकट करताना हसू येतं. स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणवून घेणारे आप्पा जाधव यांनी काल महिला असलेल्या सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचा दावा केला. आम्हाला प्रश्‍न पडला, महिलांवर हात उचलणे हे महाराष्ट्रात केव्हापासून

मर्दाचे लक्षण झाले.
सुक्ष्म समाजातल्या
अंधारेंची सह्याद्रीला गवसणी
छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा सोबत घेऊन सुरुवातीपासून समाजप्रबोधन करणार्‍या सुषमा अंधारे या अत्यंत छोट्या समाजातून आहेत. परंतु अखंड महाराष्ट्राला नव्हे नव्हे तर सह्याद्रीला गवसणी घालणारी विचाराची पेरणी त्या सातत्याने करत आल्या आहेत. अशा स्थितीत सुषमा अंधारे यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणे हे निर्लज्जतेचे लक्षण आहे. जी व्यक्ती महाराजांसह शाहू-फुले -आंबेडकरांच्या विचारधारेवर चालते महिला असून सातत्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. अशा महिलेविरुद्ध खोटेनाटे आरोप करणे आणि मारहाण केल्याचा दावा करणे हे षंडपणाचे लक्षण असल्याची जळजळीत प्रतिक्रिया सर्वसामान्यातून येत आहे.

Previous Post

तहसीलमधील ‘त्या’ कर्मचार्‍यांची चौकशी होणार

Next Post

महिनाभरात शाळा सुरू होणार, मात्र अद्याप समान गणवेश धोरणाचा निर्णयच नाही!

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
महिनाभरात शाळा सुरू होणार, मात्र अद्याप समान गणवेश धोरणाचा निर्णयच नाही!

महिनाभरात शाळा सुरू होणार, मात्र अद्याप समान गणवेश धोरणाचा निर्णयच नाही!

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?