पात्रूड येथील घटना
पात्रूड (रिपोर्टर) कापसाला भाव नसला तरी घरात कुठपर्यंत ठेवायचा म्हणून शेतकरी आता कापूस बाहेर काढू लागले आहेत. रात्री एका व्यापार्याने कापसाने भरलेला टेम्पो जिनिंगमध्ये नेण्यापूर्वी रात्री उशीर झाल्याने आपल्या दाात लावला होता. मात्र तो अज्ञात चोरट्याने रातोरात लंपास केला. या प्रकरणी आज सकाळी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करर्यात आला आहे.
पात्रूड-तेलगाव रस्त्यावर राहणारे मोमीन मुख्तार ईसा मियॉ हे कापसाचे व्यापारी आहेत. त्यांनी काल दिवसभर पात्रूड येथे शेतकर्याचा कापूस खरेदी करून टेम्पो भरला. या टेम्पोमध्ये 90 ते 95 क्विंटल कापूस होता. रात्री उशीर झाल्याने त्यांनी तो कापूस जिनिंगवर नेण्याऐवजी आपल्या घरासमोर टेम्पो उभा केला. रात्री अज्ञात चोरट्याने तो टेम्पो पळविला. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर मोमीन मुख्तार इसा मियॉ यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली.