Friday, August 6, 2021
No menu items!
Homeकरिअरशाळेत सुविधा असोत की नसोत,त्या असल्याच्या दाखवा बीडच्या शिक्षण विभागाचा मुख्याध्यापकांना फतवा

शाळेत सुविधा असोत की नसोत,त्या असल्याच्या दाखवा बीडच्या शिक्षण विभागाचा मुख्याध्यापकांना फतवा


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्याचे शिक्षण विभाग ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडून युडायस भरण्याची सक्ती तर करत असतांनाच युडायसमध्ये माहिती चुकीची भरणेबाबत तोंडी निर्देश देत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत असून ज्या शाळांमध्ये वीज, ग्रंथालय, स्वच्छतागृह यासह अन्य सुविधा नसल्या तरी त्या सुविधा आहेत अशी माहिती संबंधित युडायसमध्ये भरावी असा संबंधित मुख्याध्यापकांवर दबाव टाकला जात आहे. सदरचा प्रकार हा अत्यंत चुकीचा असून असे तोंडी आदेश देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी.

राज्याच्या शैक्षणिक विभाग प्रत्येकवर्षी शिक्षण विभागाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी प्राथमिक शाळेमध्ये काय अडचणी आहेत याची माहिती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून युडायस संकेतस्थळावर भरून घेतली जाते. गेल्या पंधरा दिवसापासून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हे आपल्या शाळेत काय-काय सोयी सुविधा आहेत याची माहिती भरत आहेत. अनेक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत ज्या सुविधा आहेत त्याचीच माहिती भरली. मात्र गेल्या चार दिवसापूर्वी शिक्षण विभागाकडून त्यांची ही माहिती तोंडी आदेशाद्वारे खोडण्याचे प्रमाण या मुख्याध्यापकाला दिले आणि त्यांनी आपल्या शाळेमध्ये शाळेची विद्युत व्यवस्था बंद केली असली तरी शाळेत विद्युत व्यवस्थार उपलब्ध आहे असे लिहा, शाळेला स्वच्छता गृह नसले तरी ते स्वच्छता गृह असल्याचे नमुद या माहितीत करा, शाळेतील आवंतर वाचणाची पुस्तके बोटावर मोजण्या एवढीच असली तरी शाळेत आवंतर वाचणीसाठी ग्रंथालय उपलब्ध असल्याचे नमुद करण्याचे आदेश या मुख्याध्यापकाला सांगण्यात आले. त्यानुसार काही मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची युडायसवर भरलेली माहिती पुन्हा दुरूस्त करून शाळेतील उपलब्ध सुविधा नसल्या तरी असल्याचे नमुद केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!