Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडबीड जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात पण साध्या पद्धतीने साजरी

बीड जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात पण साध्या पद्धतीने साजरी


बीड (रिपोर्टर):- गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या कार्यकाळात सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. शासनाने ज्या काही नियमावली घालून दिल्या आहेत त्या नियमानुसार सण उत्सव साजरे होत आहेत. आज बकरी ईद असल्याने यंदाची ईदही अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. मुस्लिम बांधवांनी घरीच ईदची नमाज अदा केली.

देशभरामध्ये कोरोनाचा संसर्ग दोन वर्षापासून सुरू झालेला आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी जास्त प्रमाणात होत असल्याने अजुनही शासनाने पुर्णत: ढील दिलेली नाही. तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने नियमावली जाहिर केलेली आहे. त्या नियमावली नुसार सार्वजनिक कार्यक्रम पुर्ण केले जातात. त्याच बरोबर धार्मिक कार्यक्रमावरही बंधन घालण्यात आलेले आहेत. आज बकरी ईद आहे या निमित्ताने शासनाने नियमावली ठरवून दिल्यानुसार मुस्लिम समाजाने साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी केली. घरीच नमाज अदा करून नियमाचे पालन करण्यात आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!