Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडलोकशाहिर सत्यशोधक अण्णाभाऊंना अभिवादन

लोकशाहिर सत्यशोधक अण्णाभाऊंना अभिवादन

बीड (रिपोर्टर):- कष्टकरी,कामगार, वंचित यांना आपल्या साहित्यातील नायक बनवून वंचित सोशितांचा आवाज आपल्या साहित्यातून बनवून ज्यांनी इतिहास रचला अशा सत्यशोधक लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची आज १०१ वी जयंती. त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहरातील साठे चौक येथील अण्णाभाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याला समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अदरांजली वाहिली.
केवळ दीड दिवस शाळेत जावून ज्यांनी आपले अफाट साहित्य निर्माण केले, जगाच्या अनेक भाषेमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतर झाले, कथा आणि कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले असे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबर्‍या यातून प्रामुख्याने कामगार आणि वंचित, कष्टकरी यांच्या व्यथा, वेदना मांडल्या. साहित्यातील त्यांचे नायक, नायिका अन्यायाविरूद्ध बंड करून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडायच्या अशा या थोर जगविख्यात लोकाशाहिर अण्णाभाऊ साठेंची
आज १०१ वी जयंती आहे. जागतिक सत्य म्हणणार्‍या ‘पृथ्वीही शेष नागावर उभा राहिली नसून ती कष्टकरी, कामगारांच्या तळ हातावर उभा राहिलेली आहे’ असे साहित्यीक अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यासाठी बीड शहरामध्ये वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समितीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीनेही अण्णाभाऊंना अभिवादन करण्या सोबतच आज सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आ.संदिप क्षीरसागर, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, अखिल भारतीय कॉंग्रस पक्षाचे अनुसुचित जातीचे सरचिटणीस रविंद्र दळवी, सोबतच डिपीआयचे अजिंक्य चाांदणे, समता परिषदेचे सुभाष राऊत, मानवी हक्क अभियानाचे मधुकर तात्या लोंढे, विष्णु मुजमुले, कल्याण ताकतोडे, सतिष कापसे, बसपाचे वासनिक गोविद साठे, दादा हातागळे, बळीराम चांदणे, जयंती उत्सव समितीचे सचिव पंकज चांदणे यांनी प्रामुख्याने अण्णाभाऊंना अभिवादन केले.

Most Popular

error: Content is protected !!