Monday, January 24, 2022
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाची घुसखोरी रोखण्यासाठी जिल्ह्याच्या बॉर्डरवर आरोग्य शस्त्रधारी

कोरोनाची घुसखोरी रोखण्यासाठी जिल्ह्याच्या बॉर्डरवर आरोग्य शस्त्रधारी


आष्टी तालुक्याच्या सिमेवर ३ चेकपोस्ट पुन्हा सुरू
अंभोरा चेकपोस्टची तहसीलदार दळवी,गटविकास अधिकारी मुंडे
यांच्याकडून पाहणी कडक निर्बंध करा कर्मचार्‍यांना सूचना

आष्टी | अक्षय विधाते
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली असून आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने बीड येथे दि.३० जुलै झालेल्या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनजंय मुंडे यांच्या कोरोना आढावा बैठकीत पुन्हा कडक निर्बंध लावा नगर जिल्ह्यातून किंवा परजिल्हातून येणार्यांची ऍन्टीजन टेस्ट करा तेव्हाच प्रवेश द्या निर्बंधमुक्त होण्यासाठी परीकाष्टा करा असे आदेश देण्यात आल्याने परजिल्हयातून येणार्‍या नागरीकांची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आष्टी तालुक्याच्या सिमेवर पुन्हा ३ चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत.या चेकपोस्टवर प्रवाश्यांना अडवून ऍन्टीजन टेस्ट करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.आज दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रभारी तहसिलदार शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी अंभोरा चेकपोस्टची पाहणी करून कडक निर्बंध लावण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या.
तालुक्यातील अंभोरा,दौलावडगांव,चिंचपूर याठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आले असून याठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांसह पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात परजिल्हयातून येणारे नागरीक बिनधास्त फिरत असल्याने कोरोना विषाणूचा फैलाव कमी होत नसल्याने या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या कोरोना आढावा बैठकीत त्यांनी पुन्हा कडक निर्बंध लागू करा,चेकपोस्ट सुरू करा अशा सूचना दिल्यानंतर तालुक्याच्या सिमेवर चेकपोस्ट सुरू करण्यात आले आष्टी तालुक्यातील चिंचपूर,दौलावडगांव,अंभोरा या ठिकाणी तहसीलदार शारदा दळवी यांनी दिलेल्या आदेशानुसार चेकपोस्ट सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांची तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.अंभोरा चेकपोस्टला प्रभारी तहसिलदार शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी आज दुपारी १२ वाजता भेट देऊन कर्मचार्‍यांना सूचना केल्या यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धनवडे, ग्रामसेवक मुळीक,पोलिस,आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अंभोरा येथे चेकपोस्टवर २ आरोग्य कर्मचारी आणि २ पोलीस,२ शिक्षक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी येणारी वाहने पोलिसांकडून थांबविण्यात येतात. त्यानंतर आरोग्य कर्मचारी दुचाकीवरील किंवा चार चाकी वाहनामधील प्रवासी नागरिकांची २४ तास तपासणी करीत आहेत.ऍन्टीजन टेस्ट करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.पॉझिटिव्ह व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये भर्ती केले जाणार आहे.नागरीकांनी कोरोना रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करावे.
-ज्ञानेश्वर कुकलारे (सहाय्यक पोलिस निरीक्षक,अंभोरा)


नगर-बीड रस्त्यावर बीड जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या आष्टी तालुक्याच्या सिमेवर चिंचपूर,अंभोरा येथे चेक पोस्ट तयार करण्यात आले जामखेड तालुक्यातून येणार्‍या वाहनांची तपासणी चिंचपूर येथे तर नगरहून येणार्‍या वाहनांची अंभोरा येथे करण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. चेक पोस्ट वर शिक्षक,पोलिस,आरोग्य कर्मचारी यांच्या ड्युट्या सुरु झाल्या आहेत.तालुक्यातील नागरीकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करुन जिल्हातील काही तालुके निर्बंधमुक्त झाले आहेत.आपला तालुका निर्बंधमुक्त होण्यासाठी नियमांचे पालन करावे
-सलिम चाऊस ( पोलिस निरीक्षक,आष्टी)

ऍन्टीजन टेस्ट करून निगेटिव्ह असेल तरच प्रवेश
आष्टी तालुक्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक लक्षात घेता परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांची बीड जिल्ह्याच्या सीमेवरच तपासणी करण्यासाठी ३ चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी आरोग्य विभाग,शिक्षक आणि पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चिंचपूर दौलावडगांव येथील चेकपोस्ट लोक अदालत असल्याने कर्मचारी कमी असल्याने सायंकाळपर्यंत ऍक्टीव करणार आहोत अंभोरा येथे चेकपोस्ट सुरू झाले आहे.चिन अमेरिका येथे कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे.आपल्याकडे वाढू नये यासाठी गर्दी करु नका,विना मास्क फिरु नका,नियमांचे तंतोतंत पालन करा जिल्ह्यात ऍन्टीजन टेस्ट करुनच प्रवेश दिला जाणार आहे.
-शारदा दळवी (प्रभारी तहसिलदार,आष्टी)

Most Popular

error: Content is protected !!