बीड (रिपोर्टर) चक्कर आल्याने एका 58 वर्षीय इसमाला उपचारादरम्यान जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली.
भाऊसाहेब विठ्ठल शिंदे (वय 58 वर्षे, रा. निरगुडी, ता. पाटोदा) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. काल भाऊसाहेब यांना चक्कर आल्याने त्यांना रात्री जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना रात्री 1 वाजता त्यांचा मृत्यू झाला. सकाळी पीएम करुन नातेवाईकांच्या ताब्यात बॉडी देण्यात आली.