Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपाप झाकण्यासाठीच तलावाचा सांडवा फोडला ,संतप्त शेतकर्‍यांनी केला दोन तास रास्ता रोको

पाप झाकण्यासाठीच तलावाचा सांडवा फोडला ,संतप्त शेतकर्‍यांनी केला दोन तास रास्ता रोको

आरणवाडीचे शेतकरी आक्रमक; अधिकारी,गुत्तेदारांवर गुन्हे दाखल करा
किल्ले धारूर (रिपोर्टर):- धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा का फोडण्यात आला? असा प्रश्‍न उपस्थित करत 300 ते 400 शेतकरी रस्त्यावर उतरत या शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सांडवा फोडणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी केली. या आंदोलनात सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते यांचा सहभाग होता. भाजपाचे रमेश आडसकर, सुनिल शिनगारे, बाळासाहेब कुरूंद, बंडु सावंत, सिद्धेश्‍वर रंधवे यासह आदी जण या आंदोलनात सहभागी झालेले होते.


काही दिवसापूर्वी आरणवाडी साठवन तलाव शंभर टक्के भरलेला असल्याने त्यातील पाणी सांडवा फोडून जाऊ देण्याचे आदेश जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले होते यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली रस्ते विकास महामंडळ व जलसंधारण विभाग यांच्या अधिकार्‍यांनी दोन दिवस पत्रकबाजी केली आणि अखेर सांडवा फोडण्याचे आदेश देण्यात आले यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली जल हेच जीवन म्हटले जाते परंतु भ्रष्ट गुत्तेदार व भ्रष्ट अधिकारी यांनी संगनमत करून शेतकर्‍यांचा कुठलाही विचार न करता पाण्यामुळे रस्ता खचत असल्याचे कारण दाखवून लाखो लिटर पाण्याची नासाडी केली.
या तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडण्यात आला यामुळे तलाव परिसरातील आरणवाडी, ढगेवाडी, चोरंबा येथील शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. शेतकर्‍यांनी आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे धाव घेतलेली आहे. सांडवा फोडल्याचा निषेधार्थ आज तलावाशेजारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती ठप्प झाली होती शेतकरी मात्र रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सांडवा फोडणार्‍या अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती या आंदोलनामध्ये परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत यात धारूर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरीक देखील सहभागी होते हा तलाव धारूर शहरातील नागरिकांसाठी ही वरदान ठरणार आहे.उप अभियंता साठे यांनी ऑक्टोबरपर्यंत हा सांडवा बांधून दिल्या जाईल असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर शेतकरी थोडेसे शांत झालेले आंदोलनाची निवेदन तहसीलदार वंदना शिरोळकर यांच्याकडे देण्यात आले यावेळी मंडळाधिकारी मुंडे ,कुरेशी हेदेखील उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Most Popular

error: Content is protected !!