बीड (रिपोर्टर) बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह रोकण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. काही जण लपून-छुपून बालविवाह करतातच. 2 जून रोजी वेताळवाडी येथे 14 वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांना झाल्यानंतर सदरील अधिकार्यांनी घटनास्थळी जावून बालविवाह रोखून मुलीच्या व मुलाच्या माता-पित्यासह भटजी , आचारी, वाजंत्री, फोटोग्राफर, मंडपवाल्यासह 32 नातेवाईकांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील एका 14 वर्षीय मुलीचा विवाह 2 जून रोजी होत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांना झाल्यानंतर सदरील अधिकार्यांनी घटनास्थळी जावून विवाह रोखला. या प्रकरणी ग्रामसेवक शंकर मुरलीधर मेहेत्रे यांच्या फिर्यादीवरूएन भास्कर आश्रुबा पालवे (मुलीचे वडील), सिंधूबाई भास्कर पालवे (मुलीची आई), आसरू रघू पालवे (मुलीचे आजोबा), केसराबाई आसरू पालवे (मुलीची आजी), शिवाजी आश्रुबा पालवे (चुलते), संगिता शिवाजी पालवे (चुलती), चंद्रकांत राघू पालवे (चुलते), साखरबाई चंद्रकांत पालवे, भीमराव पालवे, चतुराबाई भिमराव पालवे, विठ्ठल पालवे, परमेश्वर पालवे, युवराज पालवे, सुभाष पालवे, एकनाथ पालवे, शंकर पालवे, लहू पालवे, अशोक वनवे, रामराव मारुती वनवे, विजयकुमार कारभारी गोल्हार, राहुल सुभाष काकडे, संदीप गर्जे (नवरदेव, रा. सुर्डी ता. आष्टी), अर्जुन बाबू गर्जे (नवरदेवाचे वडील, रा. वेताळवाडी), पवार (फोटोग्राफर) यासह अन्य अशा 32 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.